Posts

दुसऱ्या लग्नाची गोष्ट...

Image
 'ए क नयी आझादी का जश्न मनाओ - Begin again with a Smile'  या टॅगलाईनने सुरु होणारी कोलगेटची एक अत्यंत सुंदर जाहिरात टीव्हीवर येते. एक ज्येष्ठ महिला अत्यंत आनंदात मुलं-सुना, लेकी आणि नातवंडांना हॉटेलमध्ये पार्टीला बोलावते.. सगळे एकत्र आल्यावर जरा वेळात एक समवयीन तिच्याचसारखा  उत्साही आनंदी इसम तिच्या शेजारी येऊन उभा राहतो. 'हा कोण?' असा प्रश्नार्थक भाव घेऊन सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघतात तेव्हा ती बोटात घातलेली अंगठी दाखवते. म्हणजे या ज्येष्ठ महिलेने तिच्यायोग्य वर शोधून स्वतःचेच लग्न जुळवले असते.. आणि या निर्णयानं संपूर्ण कुटुंब आनंदी होताना आपल्याला दिसतं. ही माझी फार आवडती जाहिरात आहे खरंतर, पण एखाद्या ज्येष्ठ महिलेने किंवा पुरुषाने त्यांचा लग्नाचा जोडीदार गेल्या नंतर स्वतः पुन्हा लग्न करणे वगैरे ही संकल्पना अजूनही या जाहिरातीत दिसते तितक्या सहजपणे आपल्या समाजाला स्वीकारार्ह नाही. सामाजिक संस्कारच या पद्धतीचे असतील तर कितीही गरज वाटली तरी घरातील एकल ज्येष्ठासाठी जोडीदार शोधून त्यांचे लग्न लावून देण्यासारखा निर्णय एखाद्या कुटुंबासाठी विचारांच्या पलीकडले, अधिक धारिष्ठ्...

ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ?

Image
ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो आणि त्याचे एखादे समर्पक उदाहरण द्यायला कोणी सांगतं तेव्हा तेव्हा ब्रिटनच्या जॉन ली ह्यांची कथा स्मृतीपटलावर येते.     15 नोव्हेंबर 1884 रोजी इंग्लंडमध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जॉन ली ला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यावर जॉन ली कोर्टात ओरडून सांगत राहिला की मी निर्दोष आहे, जर खरंच देव अस्तित्वात असेल तर तो मला नक्कीच मदत करेल. 23 फेब्रुवारी 1885 हा दिवस होता जेव्हा जॉनला फाशी दिली जाणार होती.  फाशी देण्यापूर्वी फाशीची दोरी आणि फळी यांची स्थिती आणि ताकद तपासण्यात आली होती, जेणेकरून फाशी देताना कोणताही अडथळा येणार नाही. आता जॉन लीला फाशीसाठी त्या जागेवर आणण्यात आले. जल्लादने जॉन लीचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला आणि त्याच्या गळ्यात फास घातला. ऑर्डर मिळताच जल्लादने हँडल दाबले पण फळी उघडली नाही. हँडल वारंवार दाबले, पण फळी उघडू शकली नाही. फाशी एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली. यानंतर तपास सुरू झाला, आणि चाचणी म्हणून, जॉन ली सारख्याच वजनाच्या पुतळ्याला आणून फाशी देण्यात आली आ...
 कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला  कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला  आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा  कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला  आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला  घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला   जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा  जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता  घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला  झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले  त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला रश्मी पदवाड मदनकर

गम्य-अगम्य

Image
  अनेकदा आयुष्य एका लयीत सगळं आलबेल असण्याच्या भ्रमात सुरु असतं..आपण रमत राहतो, गाफील होत जातो. अचानक एखादं वळण, एखादा अपघात, एखादा हादसा होतो आणि सुरळीत चालू असलेलं आपलं आयुष्य अगम्यतेच्या वाटेवर येऊन ठेपतं. होय असं घडतं बरेचदा.. फक्त ती अगम्यतेची वाट प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींचे हे असे किस्से कळतात-पचतात. काहींचे किस्से आपल्या आकलनाच्या बाहेरचे असतात म्हणून पटत नाहीत, पचत नाहीत. जे जे काही आकलनाच्या पलीकडचं आहे ते ते सर्व अशक्यतेच्या सोप्या व्याख्येत बसवून आपण मग मोकळे होण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. कारण त्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याची आपली तयारी नसते. पण जे गुढतम काहीतरी आहे किंवा शक्यतेच्या पलीकडचं आहे असं आपल्याला वाटत असतं ते तसं असतंच असं नव्हे.. हे म्हणजे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरेसारखं असू शकतं.. मांजरेनं डोळे मिटले की तिला वाटत असतं सगळीकडे अंधार आहे आपल्याला कुणीच बघू शकत नाही.. इकडे तिच्या भोवतालचं अक्ख जग मात्र तिला उघड्या डोळ्यानं बघत असतं..आणि तिच्यासाठी आपापल्या परीनं मनसुबे रचत असतं. पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल अमोलच्या (नवरा) मित्राच्या वडि...

गुलाबी दिलासे

गुलाबी मनाचे गुलाबी उसासे गुलाबी क्षणांचेच सारे दिलासे कसा गंध वारा सुटे हा गुलाबी गुलाबी सुरांचे तराणे जरासे तुझ्या आठवाची कथाही गुलाबी दिशाही गुलाबी नशाही गुलाबी असा रंग येतो भरूनी सदेही गुलाबी पिडेची व्यथाही गुलाबी गुलाबी सुगंधी जरा श्र्वास होतो गुलाबी पुन्हा प्राण दाटून येतो पहाटे पडावे तुझे स्वप्न वेडे गुलाबी असाही जरा भास होतो नदी वाहते त्या किनारी गुलाबी तिच्या वाहण्याची निळाई गुलाबी अशी धावते भेटण्या सागराशी मुक्या पावली वेदनाही गुलाबी गुलाबी तुला भेटण्या ओढ दाटे गुलाबी सरेना अशी रात्र वाटे कुठे शोध घेऊ तुझ्या संगतीचा गुलाबी पहारा गुलाबीच काटे मिटू लागली पापणी ही गुलाबी गुलाबी असे काळ वेळा गुलाबी उजाडेल आता दिशा रंग माती पहाटे पुन्हा रागदारी गुलाबी. - रश्मी पदवाड मदनकर #भुजंगप्रयात  

असमाधान आणि अतिमहत्वाकांक्षा हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे..

Image
  सतत चांगल्यातलं वाईट शोधण्याची सवय एकदिवस स्वभाव होत जातो. एकदा हा स्वभाव बनला की आयुष्याने कितीही चांगले केले तरी त्यात वाईट शोधण्याची सवय काही जात नाही. जेव्हा आपण असमाधानकारक, तक्रारयुक्त जगणं दीर्घकाळ जगायचं चालू ठेवतो, तेव्हा काय होतं? हा आपला संपूर्ण इतिहास बनत जातो. कृतज्ञ व्यक्ती समाधानाने समृद्ध असते, आणि त्या उलट कृतघ्न मनुष्य अनंत असंतोषाच्या दारिद्र्यात यातना भोगत राहतो. महत्वाकांक्षा असावी पण ती पूर्ण होण्याचं सुख भोगता येईल इतकी असावी. स्वप्नवत वाटणाऱ्या इच्छा किंवा इतरांसाठीसुद्धा सहज साध्य नसणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सहज आपल्याला मिळूनही त्याचा आनंद मानता-मनवता येत नसेल आणि ते असमाधानावर अर्धवट सोडून त्यापुढली महत्वाकांक्षा, त्यापुढलें स्वप्न आणि डोंगराएवढ्या इच्छा आपण पुढ्यात मांडून ठेवत असू, जे जे मिळालय, मिळतंय त्यातलं आणि आहे त्यातलं समाधान आनंद कधीच उपभोगता येत नसेल तर आपण या जगातले सगळ्यात दुर्दैवी, गरीब जीव आहे असे समजावे. महात्मा गांधी म्हणतात ना .. We notice that the mind is a restless bird; the more it gets the more it wants, and still remains unsatisfied...

सावध हरिणी, सावध गं !

Image
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवून विश्वासात घेऊन तिच्याकडून हेतुपुरस्सर काही आक्षेपार्ह कृत्य करून घेण्यात आले होते आणि नंतर त्याचे व्हिडीओ सार्वजनिक रीतीने प्रसारित करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैशांची मागणी केली गेली. ही मागणी पूर्ण करणे जसजसे कठीण होऊ लागले त्या मुलीने इतरांची आर्थिक फसवणूक करणे सुरु केले आणि दुष्टचक्रात खोलवर अडकत गेली. नागपूर जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीच्या, सुशिक्षित-प्रतिष्ठित कुटुंबातल्या महिला. व्यस्त कुटुंब आणि एकांताला कंटाळून सोशल माध्यमावर हेतुपुरस्सर फुसलावणाऱ्या टोळीतील वेगवेगळ्या इसमाच्या प्रेमात पडल्या आणि भावनेच्या आहारी जाऊन आक्षेपार्ह चॅटींग, फोटो पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग या माध्यमातून नको त्या चुका करून बसल्या, आणि मग सुरु झाला जीवनमरणाचा खेळ. हे व्हिडीओ-फोटो कुटुंबाला पाठवावे किंवा सार्वजनिक करावे असे वाटत नसेल तर 'त्या' ...