Thursday, 29 March 2018

हे बघ ऐक, 

फक्त निभवायचंय म्हणून येऊ नकोस, निभावाव लागतं म्हणून निभावणारे नाईलाज आणि कुचंबणेला त्रासून परत फिरतात..

तेव्हा तू जा .. 
जिथे कुठे तुझ्या मनाचं समाधान असेल, जिथे प्रेमाची आस असेल तू जा. 
मी नाही घालणार हाक तुला .. 

पण काळाच्या ओघात आलीच आठवण तर .. माझ्या प्रेमाची जाणीव झालीच प्रखर तर 
विश्वासाच्या सोबतीची गरज तीव्र होईल .. अन डोळे ओथंबून वाहू लागतील ...तेव्हा 
तेव्हाच ये परत .. 

साथ निभवायचीय म्हणून येऊ नकोस 
प्रेम जगवायचंय म्हणून ये ,,, 
इतकंच ..

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...