Wednesday 14 March 2018

ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू
ऋतू सोहळा आटपतांना आठवतो तू

सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी
ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू

उधळून देता इंद्रधनुचे रंग नभाशी
तांबडं फुटता आकाशी बघ आठवतो तू

पाऊस धारा खिडकी मधुनी ओघळताना
तुषार उडता गाली अलगद आठवतो तू ...

तू आठवता मनात भरते घन व्याकुळ
नजरेमध्ये ओल दाटता आठवतो तू   ...

रश्मी मदनकर
१३.०३.१८ 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...