कॅनवासवर पसरलेली अखंड रात्र..
बंद खिडकीच्या आतल्या गडद अंधारासारखी
पुसटश्या किरणांची तिरीप आत शिरावी अन
चंदेरी कवडसा थेट कॅनवासच्या कोपर्यावर पडून उजळून निघावा
तसेच अगदी … छताचा तुटका गळका झरोखा
आवस असल्याचे संकेत देत असतांना
तो एकच ध्रुवतारा लुकलुकतांना दूर कुठेतरी जाणवतो आणि
त्याचा मंद उजेड झरोक्यातून तळव्यात साठलेल्या अश्रूत सांडतो
अन खोलीचा अक्ख्खा अंधारा कॅनवास उजळून निघतो
गडद काळ्या मध्येच चमकणाऱ्या त्या चंदेरी अंधारात
तुझ अस्तित्वही असंच हरवलंय अमावसेच्या चंद्रासारखं
एका बारीकश्या किरणोत्सारी आशेच्या कुशीत मी चाचपडतेय
अंधाऱ्या कॅनवासवर चित्र काढतेय ...….
एका सुंदर चित्राची कल्पना अशी गडद काळ्या रंगात न्हावून निघते
अन तरीही जगाला ती सुंदर दिसते...हीच तर शोकांतिका आहे.
No comments:
Post a Comment