Thursday, 28 January 2016

अमृता प्रीतम



माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती , प्रत्यक्ष न भेटूनही भेटत राहणारी …
ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझ्या आयुष्याची कळी नुकती जीव धरू पहात होती . जाणीवा जागृत होण्याचा काळ तो . पावसा आधी नांगरून ठेवणाऱ्या जमिनिगत …
आणि रुजण्याच्या नेमक्या क्षणी जे बीज या मातीत पडले ते इतके घट्ट रुजले कि सारे आयुष्य म्हणजे त्या बीजाची नाजूक थरथरती वेल होऊन बसली .
'अमृता ' हे माझे "माझ्यासाठी" असलेल्या "माझेच" एक नाव झाले , माझ्यातील मी , जी फक्त माझ्यासाठी माझी सखी होती. जिच्याशी मी माझे प्रत्येक उघडे वागडे नग्न सत्य कधीही शेअर करू शकत होते आणि जी मला अगदी पूर्ण पणे त्या सत्यांसकट सामाऊन घेत होती .
असे कुणी आपल्या आतच दडलेले असते याची जाणीव या अमृताच्या माझ्यात रुजण्यानेच झाली.
ती फारशी कळायची नाही आधी , पण मग म्हणूनच गूढ वाटत गेली आणि तिला जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा व्ह्याचा , त्यातही एक झिंग होती , तिला पूर्ण वाचून काढायची , तिच्यात घुसायची , इतके कि ती मीच आहे असे वाटावे .
इतके मनस्वी , इतके निर्भीड आणि इतके प्रामाणिक मन घेऊन , त्यात बरेच काही सामाऊन जाताना सुधा सत्याच्या पावित्र्याचा भास व्हावा , ओजस्वी पणाचा लखलखीत प्रकाश दिपवून टाकावा अशी होती ती .
तिच्या प्रेमाच्या व्याख्या वेगळ्या , तिची सुरक्षिततेची चौकट वेगळी.
शब्दात तिला पकडता येणे फार मुश्किल आहे , पण तिचीच एक कविता इथे देते , तेवढे पुरेसे आहे ।

आज मैंने अपने घरका नंबर मिटाया है ,
गली के माथे पे लगा , गलिका नाम मिटाया है ,

हर सड़क कि हर दिशा का नाम पोछ दिया है ,
गर ,आपने मुझे कभी तलाश करना है ,

तो हर देश कि , हर शहरकी ,
हर गलीका द्वार खटखटाओ ,

यह एक शाप है , एक वरदान है ,
और जहा भी स्वतंत्र रूह कि झलक पड़े ,

समझना वह मेरा घर है ...





अमृता प्रीतम __/\__

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...