Thursday, 5 April 2018

#आतल्यामास्तरीणबाई

Intro :-

मित्रांनो
 नवी मालिका सुरु करते आहे, नाव आहे 'आतल्या मास्तरीण बाई' चिंतनशील मनाला अनेकदा आतला आवाज काहीतरी सांगू पाहत असतो. अनेकदा तो आपल्यापर्यंत पोचतो-पोचत नाही किंवा आपण कित्तेकदा त्याकडे लक्षही देत नाही. मग एखादी घटना घडते एखादा प्रसंग पुढ्यात उभा राहतो आणि आधी आलेला आतला आवाज पुन्हा पुढ्यात येऊन उभा राहतो. म्हणतो ''बघ मी सांगितले होते ना तुला'' आणि आपल्यालाही वाटत , खरंच आपण ऐकायला हवं होतं. हा आतला आवाज म्हणजेच 'मास्तरीणबाई' आपल्याला पटले नाही पटले तरी ती शिकवणं सोडत नाही. हल्ली वाटू लागलंय आतल्या मास्तरीण बाईंनी ठक ठक केली कि आठवणीने त्याची काही टिपणं काढून ठेवावी. आज नाही कामात आले तरी कधीतरी हा धडा उपयोगात येईलच ... तेव्हा 'आतल्या मास्तरीण बाईंची न लिहिलेल्या पत्रांची पेटी उघडणार आहे मित्रांनो.... तिच्या पत्रांना माझ्या पेटीत सामील करून घेत असतांना ते तुमच्या मार्गातून प्रवास करणार आहेत, आवडले तर आपले मानून घ्या.  #आतल्यामास्तरीणबाई

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...