Monday, 29 January 2018

सख्या रे ...

श्वास तुझा अन पाश मला का सांग सख्या रे
प्रीत अशी हि जीवघेणी का सांग सख्या रे

कशास देतो नित्य नवी तू जुलमी वचने
बंध तोडुनी जातं कुणी का सांग सख्या रे

स्मरते तुजला दिवस रात्र अन भिरभिरते मी
विरह तुला का बोचत नाही सांग सख्या रे

मनात माझ्या व्यापून बसला सगळी जागा
नजर शोधते का तुला मग सांग सख्या रे

नव्हतेच काही तुझ्यात अन माझ्यात तरीही
अश्रुंमधुनी ओघळतोस का सांग सख्या रे

किती छळावे, किती रडावे तुझिया वाचून
येशील का तू द्याया उत्तर सांग सख्या रे

रश्मी मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...