अंबर हडप या गुणी लेखकाचा सकाळला वाचलेला अप्रतिम लेख.
..........................................................................................................................................
माझ्या मते हा स्वप्नांचा शो आपल्या हातात नसतो. आपला मेंदू आपल्या नकळत स्वप्नांचा शो लावून आपल्याला चकित करत जगात आजवर ज्या ज्या लोकांनी स्वप्नांचा अशक्य सिनेमा पाहिलाय, त्यांचेच सिनेमे मनातही रिलीज झाले आणि जगातही. निसर्ग जितका भव्य, क्रिएटिव्ह आणि कलेच्या बाबतीत सुंदर आहे, तितकंच त्याने आपल्याला मनही क्रिएटिव्ह दिलंय. देवाने माणसाला मेंदूच यासाठी दिलाय की त्याने जे जगात नाही ते आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या जगात तयार करावं. म्हणून तर आयफेल टॉवर बनला. म्हणून तर पिरॅमिड्स बनली. म्हणून ताजमहाल बनला आणि अशा कितीतरी वास्तू उभ्या राहिल्या, ज्यांना जगात आश्चर्य म्हटलं जातं. हे माणूसच करू शकतो. नाही तर जंगलात काही वाघ, सिंह, हत्ती काही तरी घडवताना दिसले नसते का? तरी माणसाच्या कल्पनाशक्तीला कॉम्पिट करायला देवाने काही पशू-पक्ष्यांना तयार केलंय... जशी कोळ्याची जाळी आहेत, गया पक्ष्याचे खोपे आहेत; पण तरीही माणूस तो माणूसच... वॉल्ट डिझ्ने... ज्याने जगातल्या पहिल्या ऍम्युझमेंट पार्कचं स्वप्नं पाहिलं. 100 हून अधिक बॅंकांनी या संकल्पनेला विरोध दाखवत त्याला कर्ज नाकारलं; पण जेव्हा ते उभं राहिलं, तेव्हा आज आपण म्हणतो, ते स्वप्नं कधी तरी पाहिलं म्हणून तर ते उभं राहू शकलं. आजवर लागलेला प्रत्येक शोध हा कधी ना कधी एक स्वप्नं होता आणि तो स्वप्नं होता म्हणून तो सत्यात येऊ शकला. एक वेळ खरा सिनेमा पाहायला कोटी रुपयांची गरज असेल; पण स्वप्नं नावाचा सिनेमा पाहायला आपल्याला एका दमडीच्या इन्व्हेस्टमेंटची गरज नसते. डोळे बंद केले की काळोख होतो आणि मग सुरू होतो मनातल्या इच्छांचं टेलिकास्टिंग. अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नं नावाचा सिनेमा नुसता बघून चालत नाही. तो सिनेमा सत्यात आणायला मेहनत तितकीच गरजेची आहे. कोणी म्हणतं, काही स्वप्नं खरी होत नाहीत. मी म्हणतो, आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं खरं होऊ शकतं; पण त्यासाठी हातपाय हलवायला लागतात. हा फ्री ऑफ कॉस्ट सिनेमा आपल्याला Impossible चं स्पेलिंग I m possible आहे हे सिद्ध करतो. जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाने हा स्वप्न नावाचा सिनेमा तो शून्यावर असताना पाहिलाय. मग आपण का मागे राहायचं? कॅमेरा-रोलिंग ऍक्शन म्हणा आणि सुरू करा सिनेमा. अर्थात कोणाचं वाईट चिंतून सिनेमात व्हिलन नका होऊ, तर कोणाचं तरी भलं चिंतून स्वप्नात हीरो व्हा; तर सत्यात हिरो होऊ शकाल. मेल्यानंतर देव विचारेल, सिनेमा पाहिलास का? आपण नाही म्हणालो तर तो म्हणेल... तुला टॉकीज दिलं, वेळ दिला, सगळं दिलं आणि तू सिनेमाच पाहिला नाहीस... तेव्हा उत्तर द्यायला वेळ लागू नये म्हणून आत्ताच बघायला लागा "स्वप्नं‘ ...एक थ्रीडी मूव्ही. |
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Saturday, 27 June 2015
'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...
-
फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते, उष्णता जाणवू लागत...
No comments:
Post a Comment