उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते 
ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन 
व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं
 शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्ही 
चित्रपटसृष्टीवर दोन दशके अधिराज्य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री 
स्मिता पाटील.
या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्िथत झाल्यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही.
दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. तिला या पुरस्काराची घोषणा झाल्यापासूनच नेटिझन्स सोशल नेटवर्किंग साईटवरून तिला ट्रॉल करीत तिची खिल्ली उडवत आहेत. आपल्या मनात असणाऱ्या स्मिता पाटीलची अजरामर छबी कतरिनाच्या रूपात पाहणे रसिकांना मान्यच नसल्याचे यावरून लक्षात आले.
पण हे सगळे कतरिनाच्याच वेळी का घडावे हा प्रश्नही उभा राहतो. यापूर्वी हा पुरस्कार तन्वी आझमी, श्रीदेवी, मनीषा कोयराला, उर्मिला मातोंडकर, तब्बू, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पण कतरिनाला या पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयावर मात्र वादंग सुरु झाले. कतरिनाला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन तब्बल दहा वर्ष झालीत. सध्य स्थितीत आघाडीची अभिनेत्री असूनही कतरिनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही छाप सोडू शकले नाही. गेल्या दहा वर्षात चित्रपट सृष्टीला तिने दिलेले योगदान कलेच्या अनुषंगाने पाहिल्यास फार वाखाणण्यासारखे जरी नसले तरी, तीने वारसाहक्काने इथे प्रवेश केला नव्हता. डोक्यावर हात धरणारा कुणी नसतांनाही इथे टिकण्यासाठी, तग धरून धैर्याने पाय रोवत स्वतःला सिद्ध करत राहणे यासाठी तिने घेतलेले कष्ट नाकारता येणार नाही. यापुढेही ती काम करणार आहे तेव्हा तिच्याकडून चांगल्या चित्रपटांची अपेक्षाही इथे संपत नाही.
समांतर चित्रपटातील अभिनयातून रसिकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिताचे 'मंथन' 'अर्थ' 'भूमिका' 'आक्रोश' तसेच मराठीतले 'उंबरठा' 'जैत रे जैत' सारखे चित्रपट सिने इतिहासात अजरामर ठरले.ज्या चित्रपटांनी समांतर आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधला. तिने स्त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. व्यावसायिक चित्रपट तिची प्राथमिकता कधीच होऊ शकले नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. तिच्या याच सामाजिक बांधिलकीचे आणि भारतीय चित्रपटांना दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी सन्मान म्हणून 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' प्रियदर्शनी अकॅडमीतर्फे देण्यात येतो.
अभिनयासोबतच सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजच्या काळातल्या प्रत्येक अभिनेत्रीने जपावा. कतरिना सारख्या महेनती कलाकाराने तसेच आजतागायत या पुरस्काराने सन्मानित इतर अभिनेत्रींनीं देखील स्मिता पाटीलचा हा वारसा पुढे चालवावा. पुरस्कार घेतांना ती तंतोतंत तशीच छबी असावी, तसेच योगदान दिलेले असावे, तीच प्रतिष्ठा प्राप्त असावी असा त्याचा अर्थ होत नाही. तर योगदानाबरोबरच भविष्यात तशी जाणीव निर्माण व्हावी, तसा आदर्श घडवणारा प्रयत्न केला जावा, त्यासाठी प्रोत्साहन मिळावे ह्याच हेतूने हा पुरस्कार देण्यात येतो. कतरिनाला ह्यासाठी हा पुरस्कार मिळालाय असे गृहीत धरले तर आता वाटतेय तसे आश्चर्य वाटणार नाही. आणि 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण सर्व तिचे अभिनंदनच करू.