ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो आणि त्याचे एखादे समर्पक उदाहरण द्यायला कोणी सांगतं तेव्हा तेव्हा ब्रिटनच्या जॉन ली ह्यांची कथा स्मृतीपटलावर येते.
15 नोव्हेंबर 1884 रोजी इंग्लंडमध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जॉन ली ला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यावर जॉन ली कोर्टात ओरडून सांगत राहिला की मी निर्दोष आहे, जर खरंच देव अस्तित्वात असेल तर तो मला नक्कीच मदत करेल. 23 फेब्रुवारी 1885 हा दिवस होता जेव्हा जॉनला फाशी दिली जाणार होती.
फाशी देण्यापूर्वी फाशीची दोरी आणि फळी यांची स्थिती आणि ताकद तपासण्यात आली होती, जेणेकरून फाशी देताना कोणताही अडथळा येणार नाही. आता जॉन लीला फाशीसाठी त्या जागेवर आणण्यात आले. जल्लादने जॉन लीचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला आणि त्याच्या गळ्यात फास घातला. ऑर्डर मिळताच जल्लादने हँडल दाबले पण फळी उघडली नाही. हँडल वारंवार दाबले, पण फळी उघडू शकली नाही. फाशी एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली. यानंतर तपास सुरू झाला, आणि चाचणी म्हणून, जॉन ली सारख्याच वजनाच्या पुतळ्याला आणून फाशी देण्यात आली आणि अहो आश्चर्य फळी उघडली.. पुतळ्याला फाशी लागली.
दुसर्या दिवशी जॉन ली ला पुन्हा फासावर आणण्यात आले, आणि त्या दिवशीही फळी उघडली नाही. जॉन आनंदाने ओरडला की 'हे ईश्वर तू सर्वत्र आहेस. मला विश्वास आहे तू माझ्यासोबत आहेस' फाशी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. पुतळा पुन्हा आणला गेला, टांगला गेला आणि याही वेळी फळी उघडली.
जॉनला पुन्हा तिसऱ्यांदा फासावर आणण्यात आले. जल्लादने लीव्हर दाबले पण आजही फळी उघडली नाही. हे पाहून जल्लाद भावूक झाला आणि तेथून कायमचा निघून गेला. उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. फाशी पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
हे प्रकरण आता उच्चाधिकार्यांच्या हाती आले. प्रत्येक गोष्टीची बारकाईने चौकशी करण्यात आली की, एका व्यक्तीला तीनदा फाशीच्या शिक्षेतूननिसटणे कसे शक्य आहे? इतिहासात असे कधीच घडले नव्हते. मात्र तपासात काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर कुलुपाची कडी अडकल्याने हा प्रकार घडला असावा असा कयास लावण्यात आला.
'जॉन लीला गोळ्या घातल्या पाहिजेत' असा सूर सर्वत्र उमटू लागला. न्यायाधीशांनी प्रत्येक बाबींचा गांभीर्याने विचार केला आणि असा निष्कर्ष काढला की जेव्हा जॉनला फाशी दिली गेली, तेव्हा त्याने प्रत्येक क्षणी मृतप्राय वेदना शल्य असतील. खरोखर फाशी फाशी देण्यापूर्वी या कायद्याने जॉनला नकळत तीन वेळा मारले होते. न्यायाधीशांनी हे मान्य केले.
अखेर कायदाही ईश्वरापुढे नतमस्तक झाला आणि जॉन ली ला सोडण्यात आले. जॉन ली वर लादलेली फाशीच्या शिक्षेचा फास कायमचा काढून टाकण्यात आला आणि आणि तो दोरीचा फास संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आला. ब्रिटीश कायदा अयशस्वी झाला, सुटकेचा अंतिम निर्णय देताना त्यांना ईश्वरीय शक्ती आणि जॉन ली चे निर्दोषत्व नकळतपणे मान्य करावे लागले.
त्याच्या सुटकेनंतर, जॉन ली कुटुंबासह लंडनला गेला. अनेकदा लोक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा जॉन ली सांगत असत की, फाशीच्या वेळी त्यांना एक अद्भुत दिव्य प्रकाश जाणवत असे. काळे कापड काढल्यानंतरच हा प्रकाश अदृश्य होत असे. यानंतर जॉन ली सामाजिक सेवा आणि दानधर्मात सामील झाला आणि अध्यात्मिक पद्धतीने जीवन जगू लागला होता. जॉन ली यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
जॉन ली ला फाशीपर्यंत नेणारे त्याच्या विरोधात पोलिसांना मिळालेले सर्व खोटे पुरावे हे त्याचाच मित्र जोनाथनच्या कटाचा भाग होते. असे जॉन ली च्या गावकऱ्यांनी सांगितले. जॉन लीच्या सुटकेच्याच दिवशी, त्याचा विश्वासघातकी मित्र जोनाथन ह्याला अर्धांगवायू झाला होता. जोनाथनचे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी निधन झाले.